खोची येथे प्रसिद्ध व्याख्याते व इतिहास संशोधक प्रा.श्री. नितीन बानुगडे पाटील यांच्या जाहीर व्याख्यानाला खोची ग्रामस्थ व नागरिकांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद…

0
267

SP-9 प्रतिनिधी रोहित डवरी ..

खोची/ कोल्हापूर : दिनांक 14 मे 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री भैरवनाथ मंदिर खोची येथे प्रसिद्ध व्याख्याते व इतिहास संशोधक प्रा. श्री नितीन बानगुडे पाटील यांचा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता… बुधभूषणकार, रणधुरंदर, जगाच्या इतिहासातील महापराक्रमी योद्धा स्वराज्याचे द्वितीय छत्रपती शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368 व्या जयंतीनिमित्त धगधगता लावा…. स्वराज्याचा छावा… छत्रपती संभाजी महाराज… या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते व इतिहास संशोधक प्राध्यापक श्री नितीन बानुगडे पाटील यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले होते.

या कार्यक्रमाचे आयोजक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती खोची यांनी नेटके असे नियोजन केले होते. या कार्यक्रमाला खोची ग्रामस्थ व नागरिक यांनी अलोट गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी उदंड प्रतिसाद मिळाला. प्राध्यापक श्री नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानातून जगाच्या इतिहासातील महापराक्रमी योद्धा स्वराज्याचे द्वितीय छत्रपती शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कसे होते बुधभूषणकार, रणधुरंदर, पराक्रमी कसे होते. लहानपणी खेळाच्या वयात त्या औरंगजेबासमोर ताट मानाने कसे उभे राहिले…कसं होते त्यांचे शौर्य…कसे होते त्यांचे धाडस.. कसा होता त्यांचा अभिमान… कसा होता त्यांचा स्वाभिमान… कसे होते ते महापराक्रमी.. कसे होते त्यांचे नेतृत्व व्यक्तित्व आणि कर्तृत्व हे आपल्या जाहीर व्याख्यानातून प्रा. श्री नितीन बानुगडे पाटील यांनी खूप सोप्या भाषेतून लोकांना समजेल असा इतिहास त्यांनी सांगितला.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ऐकत असताना जमलेल्या लोकांच्या अक्षरशा अंगावर शहारे आले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी आपले सर्व आयुष्य कसे पणाला लावले. लढाईची रणनीती कशा पद्धतीने त्यांनी आखली होती.. आपला राजा शत्रूचा समोर कधीही झुकला नाही का वाकला नाही… सदैव ताठ मानेने लढत राहिला… असे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते हे आपल्या शब्दात प्रा. श्री नितीन भानुगडे पाटील यांनी व्याख्यानातून व्यक्त केले… छत्रपती संभाजी महाराजांच्या वर कशा पद्धतीने तलवारीचे वार… कशा पद्धतीने डोळे काढले… कशा पद्धतीने बोटे छाटली… कशा पद्धतीने जीभ काढली गेली.. कशा पद्धतीने बोटाची नखे काढली गेलीत… हा सर्व प्रसंग सांगत असताना लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.. समाजामध्ये इतिहासाबद्दल प्रबोधन करणे ही आता काळाची गरज बनली आहे. आत्ताच्या युवा वर्गाला आपल्या देशाचा इतिहास काय आहे… महाराजांनी केलेले कार्य,कर्तुत्व व स्वराज्यासाठी दिलेले योगदान हे पोचवण्याचे काम आम्ही तुम्ही लोकांनीच लोकांच्या व युवा पिढीपर्यंत पोचवायचं काम करावयाचे आहे. याच गोष्टीचा आदर्श घेऊन आयोजकांनी या जाहीर व्याख्यानाचे नियोजन केले होते . या जाहीर व्याख्यान आयोजित केल्याबद्दल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती खोची सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व ग्रामस्थ व जमलेल्या नागरिकांच्यातून भरभरून कौतुक व अभिनंदन करण्यात आले . असेच आपल्या माध्यमातून समाजकार्याचे उपक्रम घडो यासाठी सर्वांच्याकडून समितीला शुभेच्छा देण्यात आल्या…

हा कार्यक्रम नि:पक्षपाती आयोजित करण्यात आला होता… सर्व ग्रामस्थ व लोकवर्गणीतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून SP-9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील व श्री विलास भोसले पोलीस निरीक्षक पेटवडगाव पोलीस ठाणे हे यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती खोची व खोची ग्रामस्थ यांच्यावतीने खोची मधील 40 युवक व युवती यांची नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला..महाराष्ट्र प्रशासनामध्ये व केंद्र सरकारमध्ये खोची गावचे गुणवंत..यशवंत..कीर्तीवंत 40 विद्यार्थी, युवक – युवतीं यांनी यश संपादन केले आहे.त्यांचे ग्रामस्थ व नागरिकांकडून भरभरून कौतुक करण्यात आले.

शिवप्रेरणा व शिवमंत्र बोलत असतानाचा क्षण..

या जाहीर व्याख्यानाचे आयोजक महादेव पाटील, सुशांत पाटील,रणजीत पाटील, SP-9 चे प्रतिनिधी रोहित डवरी,अनिकेत पाटील,सुरज पाटील,प्रेम पाटील, शैलेश पाटील, राज पाटील,किरण पाटील,ओंकार गुरव,शुभम पोवार, कुमार बाबर, संदीप जाधव, जालिंदर जाधव, निखिल बामणे व इतर समितीचे पदाधिकारी यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना कुमार बाबर यांनी केली. तर सूत्रसंचालन रामदास पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य त्याचबरोबर ग्रामस्थ, नागरिक युवा वर्ग, ज्येष्ठ व्यक्ती,पत्रकार बंधू, व प्रमुख पाहुण्यांचे आभार डी. एस. पाटील यांनी केले.

या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य… श्री सुशांत पाटील ग्रुप ऑफ बिझनेस, भैरवनाथ कन्स्ट्रक्शन, रोहित डवरी रॉयल फायनान्स, अमुल पशु आहार राज पाटील, ओंकार गुरव ओवी नाष्टा सेंटर, सौ रोहिणी दादासो पाटील सरपंच, अभिजीत चव्हाण भैय्या ग्रामपंचायत सदस्य, संदीप जाधव, अश्विनराव वाघ राजनंदिनी कृषी उद्योग समूह, सुरज निवृत्ती पाटील, युवराज सूर्यवंशी सरकार, रणजीत बाबर आर्मी, जगदीश पाटील भैय्या ग्रामपंचायत सदस्य, अजय बापूसो पाटील माजी उपसभापती, अक्षय सूर्यवंशी सरकार, सुहास पाटील भैरवनाथ ऑटो स्पेअर्स, अमोल आडके माऊली दूध डेरी, अमृत शिंदे सरकार, संतोष पाटील आर्मी, सौ शोभाताई दादासो पाटील ग्रामपंचायत सदस्य, अनिकेत पाटील स्टार फॅशन, संतोष बाबर, राजकुमार पाटील ग्रामपंचायत सदस्य, शैलेश पाटील भैरवनाथ रोपवाटिका, डी एस पाटील, हर्षवर्धन चव्हाण, दिग्विजय चौगुले, अमोल जयवंत पाटील, सचिन शिंगे, माणिक ढाले, रणजीत पाटील पाटील इलेक्ट्रॉनिक्स, अमोल खोत, रमेश मिस्त्री, उत्तम पाटील मॅनेजर कोगनोळी टोल, विरोचन शिंदे सरकार, डॉक्टर ओंकार पवार स्पर्श क्लीनिक, विशाल पाटील भैरवनाथ ट्रेडर्स, शुभम पो.पाटील, सागर डवरी मिस्त्री माऊली ऑटो गॅरेज, प्रवीण बाबर, सचिन जाधव, सचिन निवृत्ती माने, विनायक पंडित चौगुले, सोनाजी माने भैरवनाथ मोबाईल शॉपी, अनिल वाघ, बाळासाहेब पाटील एमडी, सुजित पाटील, निखिल बामणे, संजय पाटील सत्यजित शेती फार्म, धनराज ज्वेलर्स डीजे, अनिकेत जाधव आदित्य अथर्व मूव्हर्स, प्रतीक पाटील, मगदूम किराणा स्टोअर एम एम, अभिजीत पवार, वैभव कुरणे समाज कल्याण, प्रतीक चौगुले, अनिकेत इंगळे, हर्षल पाटील, अनिकेत पाटील अनुप, विकास पाटील शिवदत्त मोटर्स यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here