
कागल उपसंपादक स्वप्निल गोरंबेकर
कागल: सकल मराठा समाज कागल यांचे वतीने दिनांक १४/०५/२०२५ रोजी साजऱ्या होणाऱ्या छत्रपती श्री.संभाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून..
दि.१३/०५/२०२५ रोजी सायंकाळी ठीक ६.०० निपाणी वेस,कागल येथे छत्रपती श्री.संभाजी महाराजांच्या वास्तवदर्शी पराक्रमाची साक्ष देणाऱ्या शंभूराजे या तेजोमय पोवाडा नाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर..
दि. १४/०५/२०२५ रोजी सकाळी ठीक ९.३० वा. छ.श्री.शिवाजी महाराज पुतळ्यापासून छ. संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत..
वारकरी संप्रदाय कागल यांच्या सोबतीने टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर निपाणी वेस येथील छत्रपती श्री.संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात येईल.
तरी सदर सोहळ्यास कागल शहर व परिसरातील सर्व सकल मराठा बांधव व शंभूराजे प्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.