
प्रतिनिधी रोहित डवरी
खोची /कोल्हापूर: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368 व्या जयंतीनिमित्त खोची येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने बुधवारी दिनांक 14 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता प्राध्यापक श्री नितीन भानुगडे -पाटील इतिहास संशोधक व प्रसिद्ध व्याख्याते यांचे जाहीर व्याख्यान धगधगता लावा..स्वराज्याचा छावा…छत्रपती संभाजी महाराज यावर व्याख्यान आयोजित केले आहे.येथील हुतात्मा गणपती हरी मोरे व्यासपीठ पटांगण खोची येथे आयोजित केले आहे.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती खोची हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पेटवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विलास भोसले, त्याचबरोबर SP-9 मराठी माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री सागर पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.याच धर्मकार्यासाठी सर्वच माता-भगिनी, पालक, मित्र तरुण मंडळे, पत्रकार बंधू, समस्त सर्व ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित राहण्याचे आव्हान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीने केले आहे.कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले आहे.

