
पुणे एसपी नाईन प्रतिनिधी
कोथरूड मधील सुतारवाडी भागात नवीन संपर्क कार्यालय कार्यान्वित, नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कार्यालयाचे लोकार्पण संपन्न

*पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकत्न पाटील यांच्या मतदारसंघातील उत्तर भागातील पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांना बाणेरचे कार्यालय अतिशय लांब होत असल्याने सुतारवाडी भागात नवीन कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. या कार्यालयाचे लोकार्पण रविवारी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, नागरी समस्या सोडविण्याचे केंद्र म्हणजे संपर्क कार्यालय असते. मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना; प्रत्येक नागरिकाची समस्या सोडविण्यास नेहमीच माझे प्राधान्य राहिले आहे. मतदारसंघातील उत्तर भागातील पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांना बाणेरचे कार्यालय अतिशय लांब होत असल्याने सुतारवाडी भागात नवीन कार्यालय कार्यान्वित करताना मला अतिशय आनंद होतो आहे. आज या कार्यालयाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.