
एसपी नाईन पुणेे प्रतिनिधी
*बाणेर मधील २४ के सेरेनो सोसायटीच्या मागणीनुसार एमएनजीएल कनेक्शन सेवेचे नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
पुणे, ११ मे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेला सदैव तत्पर असतात. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी ते नेहमीच प्रयन्त करत असतात. नुकताच त्यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील बाणेर मधील २४ के सेरेनो सोसायटीच्या मागणीनुसार एमएनजीएल कनेक्शन उपलब्ध करून दिले आहे. आज पाटील यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील बाणेर मधील २४ के सेरेनो सोसायटीच्या मागणीनुसार एमएनजीएल कनेक्शन उपलब्ध करून दिले. आज सदर सेवेचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीतील नागरिकांच्या इतर समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याची ग्वाही यानिमित्ताने पाटील यांनी दिली. यावेळी कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, मा. नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, ओबीसी मोर्चा सरचिटणीस प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर चांदेरे, एमएनजीएलचे लोकेश सरोदे यांच्यासह इतर मान्यवर आणि सोसायटीचे सर्व रहिवासी उपस्थित होते.