
:* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खा. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळावा व वैद्यकीय सन्मान सोहळा शुक्रवारी ३० मे रोजी दु.२ वा. लोटस हाॅल, रेल्वे सिमेंट गुडस शेजारी, मार्केट यार्ड कोल्हापुर या ठिकाणी आयोजित केला असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी दिली. तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेतर्फे शनिवारी, 31 मे रोजी शिक्षण संस्था सन्मान तसेच शिक्षकांचा मेळावा आयोजित केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांनी दिली.शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारी मेळावा व वैद्यकीय सन्मान सोहळा प.पु.काडसिध्देश्वर स्वामीजी मठाधिपती श्री.सिध्दगिरी संस्थान मठ,आरोग्यमंत्री ना.प्रकाश आबीटकर, उच्च्य शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष ना.राजेश क्षीरसागर,हभप राणा महाराज वासकर अध्यक्ष वारकरी पाईक संघ पंढरपुर यांसह खा.धनंजय महाडीक,माजी खा.संजय मंडलिक, आ.राजेंद्र पाटील,आ.विनय कोरे,आ.शिवाजी पाटील,आ.चंद्रदीप नरके,आ.अमल महाडीक,आ.राहुल आवाडे,आ.अशोक माने,आ.सुहास बाबर,आ.महेश शिंदे,आ.विजय शिवतारे,माजी आ.सुजीत मिणचेकर,माजी आ.शहाजीबापु पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असुन दुपारी पहिल्या सत्रात दु.३ वा.डाॅ.शार्दुल भणगे यांचे ‘अवयवदान चळवळ जनजागृती’, दु.३.३० वा.जगदीश ओहोळ यांचे ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’, सायं.४वा.जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे ‘६५ वर्षाचा महाराष्ट्र व पुढील आव्हाने’ तर द्वितीय सत्रात सायं.५वा.ज्योती वाघमारे यांचे ‘काश्मीर ते कन्याकुमारी मदतीचा हात एकनाथ’, सायं.५.३० वा.खा.धैर्यशिल माने यांचे ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विस्तार वाढीसाठी रुग्णसेवकांचे कर्तव्य जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान होणार असुन सायं.६ वा.रुग्ण केंद्रबिंदू मानुन संवेदनशिलता जपत रुग्णसेवा करणार्या पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णालयांचा व रुग्णसेवकांचा वैद्यकीय सेवा सन्मान करण्यात येणार आहे.तरी कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्रसह राज्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारी यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष रामहरी राऊत व कोल्हापुर जिल्हाप्रमुख विनायक जरांडे यांनी केले आहे. *उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर आज संवाद बैठक* शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्या (गुरुवारी) संध्याकाळी 6 वाजता संवाद बैठक होणार आहे. ही बैठक लोटस हॉल, रेल्वे सिमेंट गुड्स शेजारी, मार्केट यार्ड कोल्हापूर या ठिकाणी संवाद बैठक होईल.*एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेतर्फे 31 मे रोजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, शिक्षक मेळावा* *कोल्हापूर :* एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शनिवार, 31 मे रोजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, शिक्षक मिळायच्या आयोजन करण्यात आले आहे.लोटस हॉल छत्रपती शाहू मार्केट यार्ड रेल्वे गुडस शेजारी कोल्हापूर येथे सकाळी 10 वाजता कार्यक्रम होईल. राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हस्ते आणि राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे राज्याचे प्रमुख आरोग्यदूत मंगेश चिवटे, प्रशांत साळुंखे (शिवसेना वैद्यकीय कक्षा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार व संस्थाचालक- शिक्षक मेळावा घेण्यात येणार असल्याचे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा डॉ बापुसाहेब आडसुळ यांनी सांगितले आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी राज्यातील 50 आदर्श संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित येणार आहे यावेळी राज्यभरातून 2000 संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित राहणार आहेत.