डॉक्टर डी वाय पाटील ग्रुप व श्रीराम सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कसबा बावडा मध्ये इंदोरीकर महाराज यांचा भव्य कीर्तन सोहळा संपन्न ..

0
32

प्रतिनिधी श्रीकांत शिंगे

डॉक्टर डी वाय पाटील ग्रुप व श्रीराम सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कसबा बावडा मध्ये इंदोरीकर महाराज यांचा भव्य कीर्तन सोहळा आयोजित केलेला होता … या अत्यंत भक्तीमय भव्य दिव्य कार्यक्रमाची जबाबदारी बावडा रेस्क्यू फोर्स या सेवाभावी संस्थेवर सोपवलेली होती व अत्यंत चांगल्या पद्धतीने बावडा रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांनी सेवा कार्य करून या कार्यक्रमाचे सूत्रबद्ध श्रोत्यांची बैठक व्यवस्था, त्यांच्यासाठी सोयी सुविधांचे सूत्रबद्ध नियोजन केले याबद्दल श्रीराम सेवा संस्था यांच्या वतीने या सर्व टीमचा सत्कार आयोजित केलेला होता त्याचबरोबर हा कार्यक्रम झाल्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणचे, पेवेलियन ग्राउंड वरील स्वच्छता मोहीम डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मधील कार्यकर्त्यांनी स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेऊन हा संपूर्ण परिसर कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून एक वेगळा आदर्श निर्माण केला

आणि याचे कौतुक सर्व ठिकाणी झाले… यानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मधील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार श्रीराम सेवा संस्था यांचे मार्फत करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला सहकार्य केलेले छत्रपती संभाजी राजे संयुक्त लाईन बाजार उत्सव कमिटी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी श्रीराम सेवा संस्थेचे सभापती श्री संतोष पाटील उपसभापती अनंत पाटील व सर्व संचालक उपस्थित होते. तसेच बावडा रेस्कयु फोर्स चे मानसिंग जाधव दादा ..व बावड्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here