
नाविद मुश्रीफ यांच्या नावाची अध्यक्षपदी घोषणा होताच बहुचर्चित कोल्हापूर दूध संघ अर्थात गोकुळ च्या राजकारणात महायुतीची पकड स्पष्ट झाली . आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या निवडीचा प्रभाव राहील . कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष होणार कोण याबद्दल चर्चा जास्त प्रमाणात रंगली . प्रथमच जिल्ह्याचे राजकारण मुंबई तसेच मंत्रालयातून रंगू लागले त्यामुळे स्थानिक नेत्याचा कस लागलाच . महायुती की महाविकास आघाडी आपले वर्चस्व कायम ठेवणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. पहिल्यांदा शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव अध्यक्षपदी चर्चेत होते. अशातच आज नाविद मुश्रीफ यांचे नाव अध्यक्षपदी पुढे येताच जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली . आणि जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांना एक बंद लिफाफा आमदार सतेज पाटील यांनी दिला आणि नाविद मुश्रीफ यांच्या निवडीवरती एकच शिक्कामोर्तब झाला.