
कागल उपसंपादक स्वप्निल गोरंबेकर
कोल्हापूर जिल्ह्यातील व विशेषता कागल तालुक्यातील निराधार , गरीब , अपंग , वंचित पात्र व गरजू लाभार्थ्यांना तालुक्यातील संबंधित गावातील तलाठी कार्यालयाकडून 21 हजार रुपयांचे आतील उत्पन्नाचा दाखला काही दिवसापासून तलाठी संघटनेच्या वतीने बंद करण्यात आले आहेत. तरी यामुळे संजय गांधी व श्रावण बाळ पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. संबंधित गावातील तलाठी यांना सदरची दाखले पूर्वीप्रमाणे देण्यासाठी सहकार्य करावे. गरजू व पात्र लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले मिळावेत यासाठी माननीय जिल्हाधिकारी सो कार्यालय यांचेकडे निवेदनाची मागणी नायब तहसीलदार कागल मान. डॉ. अर्चना कुलकर्णी मॅडम यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी खासदार संजय दादा मंडलिक सो व युवा नेते ॲड वीरेंद्रसिंह मंडलिक भैया यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य साताप्पा कांबळे बस्तवडेकर व कागल तालुका शिवसेनाप्रमुख मान. सुधीर पाटोळे यांनी याबाबत माहिती दिली. व या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणे दाखले मिळावेत. अशी मागणी केली. तर नायब तहसीलदार डॉ. अर्चना कुलकर्णी मॅडम यानी निवेदनाबद्दल सदरचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी सो यांचेकडे पुढील कारवाईसाठी ताबडतोब सुपूर्द करत आहोत. असे आश्वासन दिले. सदरचे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख मान. सुधीर पाटोळे , संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य साताप्पा कांबळे बस्तवडेकर मान. राजाराम पाटील सरपंच एकोंडी , व बाबासाहेब खोंद्रे माजी सरपंच एकोंडी यांनी हे निवेदन दिले.