एस जी आय तर्फे उद्या इंजिनिअरिंग प्रवेश मोफत कार्यशाळा..- संचालक विराट गिरी

0
12

प्रतिनिधी रोहित डवरी

कोल्हापूर: बारावी( पीसीएम) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूट तर्फे इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया 2025 – 26 संदर्भातील मोफत मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे.बुधवारी दिनांक 18 रोजी सकाळी साडेदहा वाजता.राजश्री शाहू स्मारक भवनात संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी मार्गदर्शन करणार आहेत.घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत,विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा होत आहे.नामांकित महाविद्यालयाचे मागील वर्षाचे कट ऑफ,कॅम्पची माहिती दिली जाणार आहे.नवीन वर्षातील नियम आणि बदल,कागदपत्रांची माहिती देण्यात येणार आहे,नोंदणी मोफत असून जागा मर्यादित आहे.तरी लवकरात लवकर नोंदणी करावी असे आव्हान संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ.विराट गिरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here