
प्रतिनिधि -जानवी घोगळे
कोल्हापूर – शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांगांना व विधवा महिलांना दरमहा 6000 पेन्शन, कष्टकरी, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार इत्यादींच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चुभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन उभारले आहे.
या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. समाधान हेगडकर, जिल्हा उपाध्यक्ष आशिष शिंदे, जिल्हा सरचिटणीस आदित्य कांबळे, रुपाली कांबळे,रामेश्वरी पारखे,पूनम गोस्वामी, वैशाली झाजगे,सागर कांबळे, किरण काळे, रूपाली भालेकर, पुनम गोसावी, प्रवीण पाटील, अशोक पाटील, किरण काळे, विनोद शेवाळे, उत्तम कुराडे,सागर कांबळे, पांडुरंग गांगुर्डे बशीर अत्तार, संजय (लाडू) पटकारे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी आदींनी केलं.
प्रहारच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन सुरू राहील असा इशारा प्रहार जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांनी दिला. आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप धारण करणार आहे. आंदोलकांनी घोषणाबाजी करत शासनाच्या निष्क्रिय धोरणांचा निषेध नोंदवला. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.