प्रतिनिधी जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. ३ ऑगस्ट २०२५ (रविवार), दुपारी ४ वाजता — संगीतप्रेमींसाठी आणि किशोर कुमार यांच्या चाहत्यांसाठी एक सुवर्णसंधी! मैत्री दिनाचे औचित्य साधून, किशोर कुमार यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त “ULTIMATE KISHORE” हा खास कार्यक्रम दिनेश माळी फाऊंडेशन, स्वर आभास कोल्हापूर आणि झंकार बिट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या उपक्रमाला यावर्षी दशकपूर्ती लाभत आहे. गेली दहा वर्षे रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे हा कार्यक्रम दरवर्षी अतिशय यशस्वीपणे पार पडतो आहे. केवळ गाण्यांचा आनंदच नव्हे तर समाजातील अत्यंत गरजू घटकांपर्यंत मदत पोहचवण्याच्या सेवाभावामुळेही हा कार्यक्रम उठून दिसतो.
संस्थेच्या वतीने यापूर्वी गाजलेल्या कार्यक्रमांप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम एक स्मरणीय संगीतसंध्या ठरेल यात शंका नाही. किशोर कुमार यांचे अजरामर गीतं, त्यांच्या शैलीत सादर होणार असून संगीतप्रेमींना एक अविस्मरणीय अनुभव मिळणार आहे.
आगामी वर्षी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात किशोरदांचा ९७ वा वाढदिवस दिमाखात साजरा करायचा मनोदयही संयोजकांनी व्यक्त केला आहे.
तिकिटांची माहिती:
- VIP – AB : ₹500
- C ते G : ₹400
- H ते L : ₹300
- बाल्कनी : ₹300
इन-ऍडव्हान्स टेलिफोन बुकिंगसाठी संपर्क:
- दिनेश माळी – 📞 9850587662
- समीर मोहिते – 📞 8975620929