प्रतिनिधी जानवी घोगळे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, गांधीनगर वसाहत येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि इतर सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला. रुग्णालयाच्या कार्यक्षमतेबद्दल गौरव व्यक्त करत त्यांच्या सततच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.

या सत्कार समारंभप्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये *डॉ. महेंद्र फाळके, **डॉ. महेश पाटील, **डॉ. बचारे मॅडम, **डॉ. दीपाली मॅडम, तसेच *बनसोडे सिस्टर (इन्चार्ज) आणि परिचारिका व सहकारी कर्मचारीवर्ग सहभागी होते.
या वेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व समन्वयक विक्रम चौगुले (बापू) यांनी उपस्थितांना उद्देशून बोलताना सांगितले की, “कायकल्प” ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना असून ती संपूर्ण राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय यांचे मूल्यांकन करते. रुग्णसेवा, स्वच्छता, सुविधांची उपलब्धता या निकषांवर आधारित कामगिरीच्या आधारे रुग्णालयांना गौरविले जाते.
या योजनेअंतर्गत *गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयाला सलग सात वेळा उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. हे यश *डॉ. दिलीप वाडकर यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मिळवले असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठीच हा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

या वेळी ग्राहक सेनेचे तालुका प्रमुख जितेंद्र कुबडे आणि वीरेंद्र भोपळे यांनी भाषणात सांगितले की, “गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयाने उभा केलेला आदर्श इतर पीएससी आणि उपजिल्हा रुग्णालयांनी घेतला पाहिजे. रुग्णांशी सौजन्याने वागणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि दर्जेदार सेवा देणे या गोष्टी केल्यास अनेक रुग्णालये देखील कायकल्प योजनेत पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतात.”
कार्यक्रमाचे संयोजन व आभारप्रदर्शन युवासेना करवीर तालुका सरचिटणीस सचिन नागटिळक यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत *शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रम चौगुले (बापू), **उंचगाव ग्रामपंचायत सदस्य विराग करी, **वाहतूक सेनेचे उपतालुकाप्रमुख महेश खांडेकर, **दत्ता फराकटे, **फेरीवाली संघटनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलावडे, तसेच **संजय काळुगडे, **विनोद रोहिडा, **दीपक धिंग, **शिवाजी लोहार, **विनायक पवार, **रामभाऊ साळुंखे, **बंडा पाटील, **अजित रोटे, **अजित पाटील, **आकाश शिंदे, **प्रमोद शिंदे, *योगेश लोहार यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
हा कार्यक्रम शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला असून, वैद्यकीय क्षेत्रातील समर्पित सेवकांचा सन्मान करून त्यांच्या कार्यास अधिक बळ देण्याचा प्रयत्न यामागे होता.