एमआयडीसीच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान, आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
18

रक्तदान हेच जीवनदान

प्रतिनिधी जानवी घोगळे

कोल्हापूर दि.31 (जिमाका): 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 63 व्या वर्धापनदिना निमित्त रक्तदान जीवदान हे ब्रीदवाक्य घेऊन एमआयडीसी कोल्हापूर विभागीय कार्यालयाच्या वतीने उद्योग भवन येथे भव्य रक्तदान, आरोग्य, नेत्र, दंत शिबिर घेण्यात आले. या विधायक स्तुत्य उपक्रमास एमआयडीसीचे सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी व उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांनी रक्तदान करुन या उपक्रमाची सुरुवात केली. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय.ए. नाईक यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी 100 च्या वर रक्त संकलन करण्यात आले. या शिबिरामध्ये गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम यांनी रक्तदान करून सक्रिय सहभाग नोंदविला. स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील व सोनाईचे भरत जाधव यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात लाडा फाउंड्री, सोनाई इंजिनिअरिंग, कस्तुरी फाउंड्री, कागल ची युनिकेम कंपनी, ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज या प्रमुख उद्योगासह इतर उद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सर्वांचे एमआयडीसी तर्फे आभार मानण्यात आले.

सीपीआर हॉस्पिटल शासकीय रक्तपेढीचे डॉक्टर्स, कर्मचारी तसेच डी. वाय. पाटील हॉस्पिटल तर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली. युवा ग्रामीण विकास संस्था, आरोग्य प्रतिबंधक विभाग, दिवाण डेंटल क्लिनिक आदींचे बहुमूल्य सहकार्य लाभले. यावेळी उपअभियंता अजयकुमार रानगे, अमित भुरले, आर. आर. पाटील, निलेश जाधव, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक शैलेश कुरणे आदी सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी व उद्योजक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here