प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
अंतरवाली सराटी जि जालना येथे मराठा आरक्षण आंदोलनस्थळी छत्रपती संभाजी राजे यांनी आज सकाळी भेट दिली.
काल १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज व गोळीबार मध्ये जखमी झालेल्या व सध्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या मराठा समाजबांधवांना भेटून त्यांना धीर दिला. अत्यंत अमानुष पद्धतीने पोलिसांनी केलेल्या या कृत्याची दाहकता मन खिन्न करणारी आहे.
कोणत्याही दडपशाहीला बळी न पडता समाजबांधवांनी हे आंदोलन नेटाने सुरू ठेवले आहे. पाठीशी व त्यांच्या निर्णयाच्या सोबत मी सदैव उभा आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.