कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
पिंपरी : मालमत्तेमध्ये हिस्सा मिळावा यासाठी सख्या भावालाच्या मृत्यूची कागदपत्रे तयार केली. त्याद्वारे वारस नोंद केली. ही घटना २३ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीत पिंपळे निलख, सांगवी येथे घडली.
या प्रकरणी तलाठी यांनी सांगवी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.१) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित नरेश दत्तात्रय देशपांडे (रा. पुणे), संतोष राऊत, महेश रमेश माने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी भालचंद्र दत्तात्रय देशपांडे हे जिवंत असताना देखील त्यांच्या मृत्यूचे दाखल दाखवत मालमत्तेत वारसदार म्हणून नोंदी केल्या.
या वारसनोंदीच्या आधारे भालचंद्र यांचा प्लाॅट बळकावण्याचा प्रयत्न केला. यासाठी खोटी कागदपत्रे, खोट्या नोंदी, खोटे पुरावे सादर करत करत भालचंद्र यांची तसेच सरकारची फसवणूक केली.