
प्रतिनिधी :जानवी घोगळे
जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्या वतीने सांगली येथे घेण्यात आलेल्या विभागीय कराटे स्पर्धेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुला-मुलींनी यश मिळविले. यशस्वी खेळाडू या प्रमाणे १४वर्षातील३५ किलो वजन गट मुले:- विनय प्रधान (प्रथम) १७ वर्षातील ८० किलो गट मुले:- आरफान मुल्ला (प्रथम) १७ वर्षातील मुली (ओपन गट) मृदुला जोशी (तृतीय). १९ वर्षातील ५६ किलो गट मुली नफीसा इधरसी (द्वितीय )१९ वर्षातील ६२ किलो गट मुले इस्माईल जमादार (प्रथम) तसेच को.म.न.पा.व जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर यांच्यावतीने शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेत १७ वर्षातील मुले ५ की.मी चालणे प्रज्वल धोत्रे (द्वितीय) क्रमांक मिळवला या सर्वांचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे. संस्थेच्या सचिवा प्राचार्या. सौ शुभांगी मुरलीधर गावडे. संस्थेचे सी. ई.ओ श्री कौस्तुभ गावडे. यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. या सर्वांना शाळेतील सौ धनश्री बेळगावकर (मॅडम) सुपरवायझर विना लाटकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व क्रीडा शिक्षक लहू अंगज. संजय कुराडे .साताप्पा चव्हाण.सौ मनीषा तपकिरे. साताप्पा मगदूम. जिमखाना विभाग प्रमुख प्रा.डॉ. महेश अभिमन्यू कदम. यांचे मार्गदर्शन लाभले.
माननीय संपादक,सो,
वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून क्रीडा उपक्रम सहकार्य करावे. जिमखाना विभाग प्रमुख
प्रा. डॉ.महेश अभिमन्यु कदम

