
कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर मनपा संघाचा रत्नागिरीवर दणदणीत विजय — सुहानी, निसर्गा, परिनिता यांची झंझावाती कामगिरी
रत्नागिरी — रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडापरिषद पुणे आयोजित १९ वर्षाखालील मुलींच्या विभागीय क्रिकेट स्पर्धेत श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. कोल्हापूर मनपा संघाने अंतिम सामन्यात रत्नागिरी जिल्ह्यावर केवळ १० चेंडूत ३० धावा करून थरारक विजय नोंदवला!
🔥 सुरुवातीपासूनच वादळ… कोल्हापूर मनपा थेट फायनलमध्ये!
पहिल्या सामन्यात कोल्हापूर ग्रामीणने ६ षटकांत १९ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना कोल्हापूर मनपा संघाने फक्त २ षटकांत २० धावा खेचून सामना जिंकला.
या सामन्यात सुहानी कहांडळने नाबाद १५ धावा झळकावत सामनावीर पुरस्कार पटकावला.
🏆 अंतिम सामन्यात कोल्हापूरची आक्रमक धडक
रत्नागिरीने प्रथम फलंदाजी करत २९ धावा केल्या. मात्र मनपा संघाने हा आव्हानाचा डोंगर क्षणात सपाट करत फक्त १० चेंडूत ३० धावा करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
🌟 सुहानी कहांडळ — २ भल्यामोठ्या षटकारांसह १९ धावा
🌟 परिनिता पाटील — षटकार व चौकारासह दमदार १० धावा
🌟 निसर्गा महाजन — टोकदार गोलंदाजी, ४ भेदक विकेट, अंतिम सामन्यात सामनावीर
गोलंदाजीत प्राची पाटील, समिधा चौगले, सुहानी कहांडळ व परिनिता पाटील यांनी प्रत्येकी एक महत्त्वाची विकेट घेत संघाला भक्कम बनवले.
👏 चॅम्पियन संघ
कर्णधार – परिनिता पाटील
उपकर्णधार – समिक्षा पाटील
संघातील खेळाडू :
सुहानी कहांडळ, समिधा चौगले, मयुरी थोरात, प्राची पाटील, प्रज्ञा पाटील, निसर्गा महाजन, सानिका नाईक, सई वेल्हाळ, जान्हवी चौगुले, तन्वी खळदकर, सोनाक्षी खाडे, सोनल माने, पूजा कोकरे, श्रतुजा कांबळे.
🙏 मार्गदर्शनाचे अचूक हात
या विजयानंतर संघाने श्रेय दिले —
श्री शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे दादा,
प्राचार्या मा. एम. एस. पाटील,
क्रीडा प्रशिक्षक वर्षाराणी पाटील, सरदार पाटील, विनायक पवार
क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांना.

