
कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
पार्वती शंकरराव बापट कनिष्ठ महाविद्यालय, खंडाळा (रत्नागिरी) येथे पार पडलेल्या विभागीय १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत सांगली जिल्हा व इचलकरंजी महापालिका संघांचा पराभव नोंदवत कास्य पदक पटकावले.
या स्पर्धेत संघातील पृथ्वेश जाधव व अथर्व शेळके या दोघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणे ही कॉलेजसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
🏆 यशस्वी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन! 💐
खेळाडूंच्या या यशामागे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,
संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे,
सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे
यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार,
जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव,
ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख व प्रशिक्षक प्रा. संतोष कुंडले,
प्रा. साद मुजावर, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. समीर पठाण,
रजिस्ट्रार एस. के. धनवडे व श्री. सुरेश चरापले
यांचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद कॉलेजच्या क्रिकेटपटूंनी पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध करत कॉलेजचा झेंडा उंचावला!

