विवेकानंद कॉलेजच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. साद मुजावर यांची महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती.

0
11

कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जातो व त्यासाठी विवेकानंद ज्युनियर कॉलेज मधील क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असलेले प्रा. साद मुजावर सर यांची हरियाणा येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील क्रिकेट 🏏 स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदी झाली आहे. हा विवेकानंद कॉलेजसाठी अभिमानाचा क्षण!

*प्रा साद मुजावर सर यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे मॅडम, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे सर यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. पी.थोरात सर , जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव सर, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले सर, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here