
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय डॉ. ग. वा. तगारे वक्तृत्व स्पर्धा २०२५ मध्ये उषाराजे हायस्कूल, कोल्हापूरची कु. स्वरा सागर वातकर हिने चमकदार कामगिरी करत मोठा गट (८वी ते १०वी) मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

उत्कृष्ट सादरीकरण, अचूक विषयआकलन आणि प्रभावी मांडणी याच्या जोरावर स्वराने स्पर्धेत उपस्थित परीक्षक व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. जिल्हाभरातील नामांकित शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्वराने प्राविण्य सिद्ध करून उषाराजे हायस्कूलचे नाव उज्ज्वल केले.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व स्पर्धेचे आयोजक रोटरी–रोटरॅक्ट क्लब पदाधिकाऱ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कु. स्वरा सागर वातकर – जिल्हास्तरीय वक्तृत्वात ठसा उमटवत प्रथम क्रमांकाने मानांकन!

