नशीब पालटलं! झटक्यात करोडपती झाला, पण एका सवयीमुळे पुन्हा झाला कंगाल!

0
114

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

आपले संपूर्ण आयुष्य आरामात जगता यावे म्हणून भरपूर पैसा असावा असे कोणाला वाटत नाही? कष्ट करून पैसे मिळवणे खूप अवघड असल्याने अनेकांना असे वाटते की आपल्या नशिबाचे कुलूप अशा प्रकारे उघडावे की, ते एकाचवेळी कोटींचे मालक बनू शकतील.

पण, काही लोकांचे नशीब असे असते की बंपर लॉटरी जिंकून ते रातोरात करोडपती आणि अब्जाधीश होतात. अशाच एका व्यक्तीची कहाणी सध्या चर्चेत आहे, ज्याचं नशीब इतकं चांगलं होतं की त्याने लॉटरीमध्ये करोडो रुपये जिंकले होते आणि तो ऐशोआरामात आयुष्य जगत होता, पण नंतर असं काही झालं की तो कंगाल झाला.

विली हर्ट असे या व्यक्तीचे नाव आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, विली हे अमेरिकेतील मिशिगनचे रहिवासी आहेत. 1989 मध्ये त्यांनी मिशिगन सुपर लोट्टोच्या तिकिटावर बंपर लॉटरी जिंकली. या लॉटरीमुळे त्यांच्या हातात 2.8 मिलियन पौंड म्हणजेच आजच्या हिशोबनुसार सुमारे 30 कोटी रुपये होते. ही रक्कम मोठी असल्याने त्यांना लॉटरीवाल्या लोकांकडून दोन ऑफर देण्यात आल्या होत्या.

पहिली म्हणजे ते जिंकलेली संपूर्ण रक्कम एकाच वेळी घेतील आणि दुसरी म्हणजे ते पुढील 20 वर्षांसाठी त्यांचे पैसे हप्त्यांमध्ये घेतील. त्यामुळे विली यांनी जिंकलेली रक्कम हप्त्यांमध्ये घेणे पसंत केले.

रिपोर्ट्सनुसार, ही लॉटरी जिंकल्यानंतर विली यांचे आयुष्य पूर्णपणे सेट झाले होते. परंतु ते म्हणतात की जेव्हा एखाद्याला अचानक खूप पैसे मिळतात, तेव्हा तो वेडा होतो, त्याला हे समजत नाही की या पैशाचा उपयोग काय करावा.

विली यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. पैशाने त्यांच्या मनावर वर्चस्व गाजवले. यामुळे त्यांचे कुटुंब सुद्धा विखुरले. याकाळात त्यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि त्यानंतर त्यांचे जीवन संकटात बदलू लागले.

दरम्यान, विली यांना कोकेनचे व्यसन जडले होते आणि हे व्यसन त्यांना हळूहळू बरबाद करू लागले. यादरम्यान एक घटना घडली. विली एका हॉटेलमध्ये एका महिलेसोबत होते, जिथे त्यांनी दारू पिण्यासोबत कोकेनही घेतले.

ते पूर्णपणे नशेच्या आहारी गेले होते आणि त्याच दरम्यान त्यांने महिलेशी भांडण केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या महिलेचा मृतदेह खोलीत आढळून आला. आता या खुनाचा खटला विली यांच्यावर चालला होता. खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना तुरुंगात टाकले. मात्र, त्यानंतर विली यांचे काय झाले, हे कोणालाही माहिती नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here