संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त कोतोलीत आदर्श स्वच्छताअभियान

0
203

कोतोली | प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे

संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामपंचायत कोतोलीच्या वतीने सकाळी १० वाजता भव्य व प्रेरणादायी स्वच्छताअभियान राबविण्यात आले. स्वच्छतेतूनच समाज परिवर्तन या गाडगेबाबांच्या विचारांचा जागर करत संपूर्ण गावाने या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
गावातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर व वसाहतींमध्ये स्वच्छता करण्यात आली. विशेष म्हणजे या उपक्रमात नेहरू विद्यामंदिरचे विद्यार्थी, तसेच प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील बालचमु यांनी उत्साहाने सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला. लहानग्यांच्या सहभागामुळे अभियानाला विशेष चैतन्य लाभले.
या प्रसंगी सरपंच वनिता पाटील, उपसरपंच अजित पाटील, युवा नेते व हनुमान उद्योग समूहाचे संचालक प्रशांत पाटील, महाराष्ट्र उद्योग समूहाचे संचालक सुभाष पाटील, सुभाष लव्हटे, संदीप चौगुले (इंजिनिअर), संतोष सूर्यवंशी, रविंद्र सावत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महादेव पाटील, अजित कांबळेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी स्वच्छ गाव – निरोगी समाज हा मंत्र अंगीकारण्याचे आवाहन केले. युवक व विविध तरुण मंडळांनी पुढील काळातही अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.
या स्वच्छताअभियानामुळे कोतोली गावात सामाजिक बांधिलकी, एकोप्याची भावना व स्वच्छतेविषयी जागरूकता अधिक दृढ झाली असून, गाडगेबाबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here