अपघातामध्ये पोलीस ठार, ३ वर्षांची चिमुकली पोरकी, कुरकुरे नाल्याजवळील घटना

0
71

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

जळगाव : वावडदा येथून दुचाकीने घरी जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने लोहमगार्ग पोलिस (जीआरपी) दीपक जयसिंग बाविस्कर (३२, रा. म्हसावद, ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास झाला.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या अपघाताने तीन वर्षीय मुलीचे पितृछत्र हिरावले गेले. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रहिवासी दीपक बाविस्कर हे लोहमार्ग पोलिस विभागात नोकरीला आहे. ते कामानिमित्ताने दुचाकीने वावडदा येथे गेले होते.

काम आटोपून परत घरी जा असताना वावडदा ते म्हसावद दरम्यान असलेल्या कुरकुरे नाल्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली.

ही घटना काही वाहनधारकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने खासगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.

याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षाची मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here