
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पांडुरंग फिरिंगे
कोल्हापूर शहरातील दुधाळी परिसरातील रहिवासी, अन्यायाविरोधात निर्भीडपणे उभे राहणाऱ्या आणि विविध सामाजिक प्रश्नांवर थेट रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या रणरागिणी सौ. पूजा सचिन शिंदे यांची अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडीच्या जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड म्हणजे केवळ पदवाटप नसून, हिंदुत्वाच्या संघर्षात मैदानात उतरलेल्या कार्यकर्त्याला दिलेली जबाबदारी आहे.“हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व” हे अमोघ ब्रीद देऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९१५ साली स्थापन केलेल्या अखिल भारत हिंदू महासभा या राष्ट्रनिष्ठ संघटनेत नुकताच सौ. पूजा शिंदे यांनी १० महिला सदस्यांसह प्रवेश केला असून संघटन बांधणी, महिलांचे प्रश्न, सामाजिक अन्याय आणि हिंदू समाजाच्या हितासाठी त्यांनी केलेल्या ठोस कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. नंदकुमार घोरपडे व जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र तोरस्कर यांच्या आदेशाने, महाराष्ट्र राज्य संघटक श्री. मनोहर सोरप, जिल्हा उपाध्यक्ष श्री. विकास जाधव आणि शहर उपाध्यक्ष श्री. प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत सौ. पूजा शिंदे यांना अधिकृत निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
महिला आघाडीच्या माध्यमातून संघटना अधिक आक्रमक, शिस्तबद्ध आणि जनआधारित करण्याची जबाबदारी सौ. पूजा शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली असून, हिंदू समाजाच्या प्रश्नांवर गप्प न बसता थेट कृतीतून उत्तर देणारी लढवय्या नेतृत्वाची भूमिका त्या पार पाडतील, असा ठाम विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात महिला संघटन बांधणीला वेग येणार असून, हिंदुत्वाच्या विचाराला जमिनीवर उतरवण्यासाठी एक सशक्त रणरागिणी मैदानात उतरल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. या निवडीबद्दल विविध स्तरांतून सौ. पूजा सचिन शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रसिद्धीसाठी:
सुनील सामंत
जिल्हा प्रवक्ता
अखिल भारत हिंदू महासभा, कोल्हापूर

