
कोल्हापूर प्रतिनिधी–पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या २०२६ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज गोकुळ प्रधान कार्यालय, शिरगाव येथे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाच्या हस्ते झाले.दुग्ध व्यवसाय अधिक किफायतशीर, आधुनिक व शास्त्रशुद्ध व्हावा यासाठी ही दिनदर्शिका विशेष उपयुक्त ठरणार असून, यात अद्ययावत दूध संकलन पद्धती, जातिवंत म्हैस विक्री केंद्र, रेड्या संगोपन, लसीकरण, पशुपूरक उत्पादने, सेंद्रिय खते, वंधत्व निवारण, आयव्हीएफ संकल्पना आदींची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक पानावर क्यूआर कोड देण्यात आल्याने स्कॅनद्वारे सविस्तर माहिती थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
ही दिनदर्शिका जिल्ह्यातील साडेसात हजार प्राथमिक दूध संस्थांमार्फत दूध उत्पादकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, कमी खर्चात जास्त उत्पादनासाठी ती मार्गदर्शक ठरेल, असे मत चेअरमन नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केले.यावेळी माजी चेअरमन विश्वास पाटील, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

