श्री विनयरावजी कोरे सह दूध संस्था चेअरमन–व्हाइस चेअरमन बिनविरोध निवड

0
20

कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
श्री विनयरावजी कोरे सह दूध संस्था मर्यादित, कोलोली या संस्थेच्या सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत चेअरमनपदी श्री श्रीकांत पांडुरंग चौगुले व व्हाइस चेअरमनपदी सौ. छायाताई संजय सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या इतिहासात ही निवड सहकार क्षेत्रातील विश्वास व एकोप्याचे प्रतीक मानली जात आहे.
या निवडीप्रसंगी संस्थेचे संस्थापक विकास पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना संस्थेने नेहमीच शेतकरी, दूध उत्पादक व सभासदांच्या हितासाठी काम केले असल्याचे सांगितले. नवनिर्वाचित नेतृत्वामुळे संस्था अधिक सक्षम व प्रगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी संचालक मंडळातील दत्तात्रय तांबेकर, अरविंद जाधव, नामदेव पाटील, आनंदा चिंदके, सागर पाटील, अनिल पाटील, सरदार भोसले, दगडू महाडिक, सविता कांबळे व इंदुबाई परीट यांनीही नवनिर्वाचित चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.नवनिर्वाचित चेअरमन श्रीकांत चौगुले यांनी सभासदांचे आभार मानत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे, संस्थेचा आर्थिक पाया मजबूत करणे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संस्थेचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला. तर व्हाइस चेअरमन सौ. छायाताई सावंत यांनी महिलांचा सहभाग वाढवून सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.चेअरमन श्रीकांत चौगुले यांनी आभार मानले.या बिनविरोध निवडीमुळे कोलोली परिसरात समाधानाचे वातावरण असून, संस्थेच्या प्रगतीसाठी नव्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here