
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
एस फोर ए विकास आघाडीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजू माने यांनी केली आहे. शहराच्या विकासासाठी हद्दवाढीबरोबर मेट्रो सिटीची गरज आहे, असे त्यांनी सांगितले
आघाडीचा जाहीरनामा:
- कोल्हापूर ग्रीन मेट्रोसिटी स्थापन करण्यासाठी कोल्हापुर महानगर विकास क्षेत्र प्राधिकरण (KMRDA मेट्रोसिटी) स्थापन करण्याचा प्रयत्न करणार.
- नियोजित म्हाडा व सिडको प्रकल्प राबवून सामान्य नागरीकांना घरे तसेच शहरातील ३० मीटरचे, डी.पी. प्लॅन मधील व शहराच्या बाहेरील २० कि.मी. परिसरातील ३० मीटर रस्ते केंद्र शासनाच्या निधीतुन करण्याचा प्रयत्न करणार.
- छत्रपती शाहू मिलच्या जागेमध्ये सांस्कृतिक वारसा डेव्हलपमेंट.
- शहरालगतच्या ५ कि.मी. परिसरात महानगरपालिकेच्या प्राथमिक सुविधा बाबत तसेच महानगरपालिकेची वर्षातून एकदा तरी महासभा घेण्याची (सामान्य नागरीकांच्या समस्या मांडणेकरीता महासभा) प्रथा चालू करण्याचा प्रयन करणार.
- शहरातील टी.पी. स्किम १ ते ५ मंजूर आहेत. परंतु त्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. त्याच्या सह शहरातील उर्वरित संपूर्ण क्षेत्रात शासनाकडून नोटीफीकेशन काढून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती राजू माने यांनी दिली. यावेळी सेक्रटरी श्री. एकनाथ माने, खजानिस श्री.विकास यादव व श्री. दत्तात्रय माने श्री. रूपेश घडशी उपस्थित होते.

