
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : धारदार शस्त्रांच्या धाकाने मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसवर दरोडा घालून १ कोटी २२ लाख रुपये किमतीची ६० किलो चांदी आणि सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या कोल्हापुरातील टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणने मंगळवारी पर्दाफाश केला.मुख्य सूत्रधार अक्षय बाबासाहेब कदम ३२ वय रा. तिसरा बस थांबा, विक्रमनगर कोल्हापूर याच्यासह ७ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. टोळीकडून लुटलेल्या चांदीसह दागिने हस्तगत करण्यात आले. पथकाने टोळीला टीप देणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या वाहकाच्याही मुसक्या आवळल्या आहेत.

