
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
भारत सरकारच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (MCA) अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI), कोल्हापूर चॅप्टरच्या चेअरमनपदासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. या निवडणुकीत सीएस स्वप्नील पाटोळे यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
याच वेळी सीएस प्रवीण निंगनुरे यांची व्हाईस चेअरमन, सीएस जोतिबा गावडे यांची सेक्रेटरी तर सीएस रणजित खांडेकर यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली.
या निवडणूक प्रक्रियेसाठी सीएस जयदीप पाटील, सीएस कपिला टिक्के, सीएस सचिन बिडकर, अमित कुमार गुप्ता व आकाश नायकवडी यांनी निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
निवडीनंतर नूतन चेअरमन सीएस स्वप्नील पाटोळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “संस्थेच्या माध्यमातून सूक्ष्म व लघु उद्योजकांचे प्रश्न व अडचणी प्रभावीपणे सोडविणे, तसेच कंपनी सेक्रेटरी व्यवसायाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट राहील.”
या निवडीमुळे आयसीएसआय कोल्हापूर चॅप्टरच्या कार्याला नवी दिशा व बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

