कोतोलीचा अभिमान! लव्हटे परिवारातील तिघांची भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून निवड

0
396

कोतोली प्रतिनिधी – पांडुरंग फिरिंगे
देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या कोतोली येथील लव्हटे परिवारातील तिन्ही युवकांची भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तन्मय बाजीराव लव्हटे, गणेश शिवाजी लव्हटे आणि गुरू रविंद्र लव्हटे या तिघांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि शिस्तीच्या जोरावर भारतीय सैन्यदलात प्रवेश मिळवून कोतोली गावाचा आणि लव्हटे परिवाराचा नावलौकिक वाढवला आहे.

देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेण्याचा निर्धार करत या तिघांनी अग्निवीर भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे यशस्वीरित्या पार केले. त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांकडून, मित्रपरिवाराकडून तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लव्हटे परिवारातील तिघांची एकाचवेळी सैन्यदलात निवड होणे ही कोतोलीसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असून यामुळे गावातील तरुणांना देशसेवेची प्रेरणा मिळेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.भारतीय सैन्यदलात दाखल होणाऱ्या सर्व अग्निवीरांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून, त्यांच्या कार्यातून देशाची सेवा घडो, अशी सदिच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here