
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कोतोली पंचायत समिती मतदारसंघातील शिंदे सेना पुरस्कृत उमेदवार आण्णासाहेब बाळकू गायकवाड यांनी भाचरवाडी व मानेवाडी परिसरात घर टू घर प्रचार दौरा करत मतदारांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान मतदारांनी अत्यंत आपुलकीने त्यांची विचारपूस करत विकास, स्थानिक प्रश्न आणि भावी अपेक्षांवर मनमोकळा संवाद साधला.ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच शेतीविषयक प्रश्नांवर मतदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावर बोलताना गायकवाड यांनी “सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे हाच माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे.

पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध राहीन,” असा ठाम विश्वास मतदारांना दिला.या प्रचार दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी नागरिकांनी शुभेच्छा देत विजयी करण्याचा विश्वास व्यक्त केला.यावेळी शिंदे सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. घराघरांतून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता, गायकवाड यांचा प्रचार अधिक जोमाने पुढे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.


