
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
उंड्री (ता. पन्हाळा)
येथील यशवंत फौंडेशन, उंड्री यांच्या वतीने वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रम २०२५–२६ (वर्ष तिसरे) मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
इयत्ता १० वी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार
- कु. चव्हाण प्रणाली दिलीप (गुण – १३.२०१७)
इयत्ता १२ वी सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थी - कु. यादव सोनल बावास (६३.६७%)
विशेष सत्कार
अग्निवीर भरतीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सत्कार करण्यात आले. - कु. साहिल पांडुरंग यादव (पालक – श्री. पांडुरंग नानासो पाटील)
- कु. वामन पाटील (पालक – मावशी पंडा पाटील)
विद्यामंदिर उंड्री शाळेचे पुरस्कार
उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार - कु. वायन दिपक पाटील
- कु. वेदिका संजय दाते

- उत्कृष्ट क्रीडा विद्यार्थी पुरस्कार
- कु. साहित्य अशोक नाकार्डे
- कु. वेदांत बाजीराव यादव
नियमित हजर विद्यार्थी पुरस्कार - कु. संदीप दिपक कांबळे
- कु. रेणुका चिंतामणी यादव
सर्जनशील विद्यार्थी पुरस्कार - कु. श्रेया दिपक यादव
- कु. वृंदा अमोल यादव
सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील पुरस्कार - उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार – सौ. अरुणा विष्णु जगताप
- उत्कृष्ट ग्रामपंचायत कर्मचारी पुरस्कार – श्री. कृष्णात वसंत यादव
- क्रिकेट क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान पुरस्कार – कु. अमोल दादासो यादव
शिक्षकवृंदांचा सन्मान
विद्यामंदिर उंड्री शाळेतील सर्व शिक्षकवृंदांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सत्कारार्थी शिक्षक –
श्री. दत्तात्रय शंकर गुरव
श्री. संजय उत्तम पाटील
श्री. प्रभाकर गोविंद वर्धन
श्री. सुशांत शहाजी कुंभार
श्री. अरविंदकुमार घोंडीराम सावंत
सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष
सर्व पुरस्कारांचे वितरण यशवंत फौंडेशनचे संस्थापक मा. श्री. दिनकर यशवंत यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी “ग्रामीण भागातील गुणवत्ता, कर्तृत्व व सेवाभाव यांना व्यासपीठ देणे हाच फौंडेशनचा मुख्य उद्देश आहे” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास व प्रेरणा निर्माण झाली असून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल उपस्थितांनी यशवंत फौंडेशनचे कौतुक केले.


