कोतोली जि.प. मतदारसंघात संगिता पाटील यांचा महिला-केंद्रित प्रचार;हळदी-कुंकू, बालकांना खाऊ आणि विकासाचा विश्वास

0
60


कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातील जि.प. उमेदवार संगिता शंकर पाटील यांनी मतदारसंघात हळदी-कुंकू कार्यक्रम, मुलांना खाऊ वाटप तसेच घराघरांत भेटी देत मतदारांकडून आशीर्वाद घेतले. या संवादात्मक प्रचारातून त्यांनी नागरिकांशी थेट नाळ जोडत विजयी करण्याचे आवाहन केले.या प्रसंगी बोलताना पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती मतदारांना दिली. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा मांडत, उर्वरित व प्रस्तावित विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी पुन्हा संधी देण्याचे त्यांनी भावनिक आवाहन केले.

हळदी-कुंकू कार्यक्रमामुळे महिला मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विठ्ठल रखुमाई महिला पतसंस्थेच्या चेअरमन संजीवनी कांबळे यांच्या उपस्थितीत कोतोली परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. महिलांनी पाटील यांच्या कार्याची दखल घेत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या संपूर्ण प्रचार दौर्‍यात मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत असून, संगिता पाटील यांचा विकासाभिमुख प्रचार मतदारसंघात अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here