पाचगाव जि.प. मतदारसंघात संग्राम पाटील यांची भव्य रॅली;उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

0
21


पाचगाव प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचे जि.प. उमेदवार संग्राम गोपाळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आर. के. नगर, पाचगाव परिसरातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधत विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.या प्रसंगी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.

संपूर्ण परिसरात शिस्तबद्ध व भावनिक वातावरण पाहायला मिळाले.या रॅलीला विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांची लक्षणीय उपस्थिती ही या रॅलीचे वैशिष्ट्य ठरली. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संग्राम पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.यावेळी बोलताना सरपंच प्रियांका संग्राम पाटील म्हणाल्या, “जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संग्राम पाटील आणि मी सातत्याने पाठपुरावा केला आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. त्यामुळेच आज मतदार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास उपसरपंच दिपाली गाडगीळ यांचीही उपस्थिती होती. एकूणच, विकास, न्याय आणि विश्वास या मुद्द्यांवर आधारित हा प्रचार मतदारसंघात अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here