माळवाडीत घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद; आण्णासाहेब गायकवाड यांचे विकासाचा ध्यास

0
15


कोतोली | प्रतिनिधी :पांडुरंग फिरंगे
कोतोली पंचायत समिती मतदार संघातील शिंदे सेनेचे उमेदवार आण्णासाहेब बाळकू गायकवाड यांनी आज माळवाडी येथे घर टू घर प्रचार करत थेट मतदारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती देत, त्या योजनांचा लाभ सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा आपला संकल्प व्यक्त केला.
घराघरांत भेटी देताना उमेदवार आण्णासाहेब गायकवाड यांनी शेतकरी, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. “मतदारांनी मला विजयी केले, तर यापुढेही विकास कामे मार्गी लावून परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


या प्रचार दौऱ्यास तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सरदार खोत, उपसरपंच अजित पाटील, माजी सरपंच पी. एम. पाटील यांच्यासह संदीप चौगुले, सात्ताप्पा गायकवाड, पंडित चौगुले, बाबुराव खोत, विजय खोत, सदाशिव चौगुले, सुरेश गायकवाड तसेच शिंदे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घर टू घर प्रचाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, माळवाडी परिसरात आण्णासाहेब गायकवाड यांच्या प्रचाराला चांगलेच बळ मिळाले आहे. या संवादात्मक प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, कोतोली पंचायत समिती मतदारसंघातील निवडणूक अधिकच चुरशीची ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here