घोटवडे समाजाचा जनसुराज्य पक्षाला जाहीर पाठिंबा; संगीता शंकर पाटील व सुनील चौगुले यांना विजयी करण्याचा निर्धार

0
40


कोतोली | प्रतिनिधी :पांडुरंग फिरंगे
कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य पक्षाच्या उमेदवार संगीता शंकर पाटील तसेच पंचायत समिती उमेदवार सुनील चौगुले यांना घोटवडे समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. या पाठिंबा जाहीर कार्यक्रमात मेजर अशोक बुवा यांच्यासह समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मेजर अशोक बुवा म्हणाले,
“आमदार विजय कोरे यांचे हात बळकट करण्यासाठी घोटवडे समाज खंबीरपणे पाठीशी उभा आहे. जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संगीता शंकर पाटील व पंचायत समिती उमेदवार सुनील चौगुले यांना विजयी करण्यासाठी आम्ही एकदिलाने काम करणार आहोत,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.


या कार्यक्रमास माजी सरपंच दगडू पाटील, माजी उपसरपंच बाजीराव पाटील, हनुमान उद्योग समूहाचे युवा नेते प्रशांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, श्रीकांत गाडगीळ, सुनील चौगुले,एम.डी.पाटील,सागर वर्पे ,राम सावंत,कृष्णा पाटील, विठ्ठल पाटील यांच्यासह समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करत, जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारांना पूर्ण ताकदीने पाठिंबा देण्याचा निर्धार केला. या जाहीर पाठिंब्यामुळे कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक अधिकच रंगतदार होत असून, जनसुराज्य पक्षाला बळकटी मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
घोटवडे समाजाच्या या एकसंघ पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीत जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here