
पन्हाळा प्रतिनिधी : पांडुरंग फिरंगे
संजिवन शिक्षण समूहाचे मार्गदर्शक तथा शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व डॉ. पी. आर. भोसले यांची ऑलिम्पियाड एक्झामिनेशन कौन्सिल, पुणे या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत शिक्षण संस्थेच्या मानद संचालक (Honorary Director) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभव, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य तसेच गुणवत्ता आधारित शिक्षणाचा आग्रह याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. भोसले यांनी विविध शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शिक्षक प्रशिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान दिले आहे.
या नियुक्तीबद्दल संजिवन शिक्षण समूह व संजिवन परिवाराच्या वतीने डॉ. पी. आर. भोसले यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या निवडीमुळे संजिवन शिक्षण समूहासह पन्हाळा तालुक्यातील शिक्षण क्षेत्राचा नावलौकिक वाढला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
डॉ. भोसले यांच्या पुढील शैक्षणिक कार्यास विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

