सांगली येथे झालेल्या U20 राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत श्रावणी लव्हटे प्रथम

0
161


दोनवडे (प्रतिनिधी) : पांडुरंग फिरंगे

सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या U20 राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत
53 किलो वजन गटात
एन.आय.एस. कुस्ती आखाडा, दोनवडे येथील पैलवान कु. श्रावणी महादेव लव्हटे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत राज्यभरातील नामवंत कुस्तीपटूंशी मुकाबला करत श्रावणीने आत्मविश्वासपूर्ण व आक्रमक कुस्ती सादर केली. तिच्या या यशामुळे दोनवडे परिसरासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल एन.आय.एस. कुस्ती आखाड्याचे कोच श्री. संदीप पाटील,
संस्थापक हरी अण्णा पाटील,
वस्ताद रावसो इंगवले,पालक महादेव लव्हटे,
अरुण पाटील, धनाजी पाटील
तसेच सर्व सहकारी पैलवानांनी श्रावणीचे अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here