सांगलीच्या मातीवर दोनवडेच्या लेकीचा डंका U20 राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत श्रावणी लव्हटे सुवर्णपदकाची मानकरी…

0
101


करवीर (प्रतिनिधी) :पांडुरंग फिरंगे
सांगली येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय U20 अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत
53 किलो वजन गटात
एन.आय.एस. कुस्ती आखाडा, दोनवडे येथील कर्तबगार पैलवान कु. श्रावणी महादेव लव्हटे हिने अव्वल कामगिरी करत प्रथम क्रमांक व सुवर्णपदक पटकावले.
राज्यभरातील बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांशी लढत देत श्रावणीने प्रत्येक कुस्तीमध्ये तंत्रशुद्ध खेळ, जिद्द आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवले. अंतिम लढतीत तिने प्रतिस्पर्धी पैलवानाला निर्णायक मात देत विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजयानंतर पुरस्कार स्वीकारताना तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास व डोळ्यांतले स्वप्न अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारे ठरले.
या यशामागे एन.आय.एस. कुस्ती आखाड्याचे प्रशिक्षक श्री. संदीप पाटील,
संस्थापक हरी अण्णा पाटील,
वस्ताद रावसो इंगवले,
अरुण पाटील, धनाजी पाटील
यांचे मोलाचे मार्गदर्शन व कठोर मेहनत कारणीभूत ठरली आहे.
श्रावणीच्या या ऐतिहासिक यशामुळे दोनवडे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुलीही कुस्तीच्या आखाड्यात उज्वल यश मिळवू शकतात, हे श्रावणीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here