शाहूवाडी तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा राज्यात झेंडा शिक्षक स्पर्धा परीक्षेत गोविंद जाधव यांना राज्यात प्रथम क्रमांक

0
22


पन्हाळा (प्रतिनिधी) :पांडुरंग फिरंगे
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरुड (जि. लातूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक व कर्मचारी राज्यस्तरीय ‘बोर्ड स्पर्धा परीक्षा 2025–26’ मध्ये सोनेवाडी केंद्र, शाहुवाडी तालुका येथील श्री. गोविंद कोडीदास जाधव यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
शाहूवाडी तालुक्यातील मातीशी नाळ जोडलेले, सध्या विभागीय माध्यमिक आश्रमशाळा, मांडवखिंडी येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गोविंद जाधव यांनी आपल्या अभ्यासू वृत्ती, सातत्यपूर्ण मेहनत व शैक्षणिक निष्ठेच्या जोरावर हे उज्ज्वल यश मिळवले. त्यांच्या या यशामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा शैक्षणिक मान राज्यपातळीवर उंचावला आहे.
ग्रामीण भागातून येऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे ही बाब अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, चिकाटी व समर्पणाचे हे जिवंत उदाहरण असल्याची भावना व्यक्त होत आहे.या घवघवीत यशाबद्दल
जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक), कोल्हापूर,
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती शाहूवाडी,
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती,
तसेच सहकारी शिक्षक, नातेवाईक, ग्रामस्थ व मित्रपरिवार यांनी श्री. जाधव यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here