
पाचगाव (प्रतिनिधी) :पांडुरंग फिरंगे
पाचगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट, शाखा कोल्हापूर शहर (गवळी समाज) यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मा. संग्राम पाटील (जिल्हा परिषद उमेदवार) तसेच सीमा संग्राम पोहळकर (पंचायत समिती उमेदवार) यांना जाहीर व ठाम पाठिंबा जाहीर केला आहे.
ग्रामीण भागातील सामाजिक समता, सर्वसमावेशक विकास आणि गवळी समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून संग्राम पाटील व सीमा पोहळकर यांच्यावर यादव समाजाने विश्वास व्यक्त केला आहे. समाजहिताच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेणारे, सामान्य माणसाशी थेट संवाद साधणारे आणि विकासाभिमुख दृष्टीकोन असलेले नेतृत्व म्हणून त्यांची निवड केल्याचे यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या जाहीर पाठिंब्यामुळे पाचगाव मतदारसंघातील निवडणूक वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली असून यादव समाजातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सामाजिक संघटनांचा वाढता पाठिंबा हा उमेदवारांच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
यावेळी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या वतीने असे सांगण्यात आले की, “समाजाच्या अपेक्षा, युवकांचे प्रश्न, महिलांचे सक्षमीकरण व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या उमेदवारांनाच पाठिंबा देण्याचा आमचा निर्णय आहे.”
या जाहीर पाठिंब्याबद्दल संग्राम पाटील व सीमा पोहळकर यांनी यादव समाजाचे व ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत, पाचगावच्या विकासासाठी प्रामाणिक व पारदर्शक काम करण्याची ग्वाही दिली.


