सेवेचा संकल्प… श्रद्धेचा प्रवास! सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या वैद्यकीय शिबिरासाठी जनसुराज्य कडून भक्तांसाठी मोफत प्रवास सेवेचा शुभारंभ…

0
28


कोतोली प्रतिनिधी :पांडुरंग फिरंगे
हरी ॐ… जय गुरुदेव!
सद्गुरु अनिरुद्ध बापू म्हणजे भक्तांसाठी केवळ गुरु नव्हे, तर आधार, आश्वासक शक्ती आणि निस्वार्थ प्रेमाचा अखंड झरा! त्यांच्या सेवेसाठी वाहून घेतलेल्या गुरुभक्तांसाठी एक अत्यंत भावूक आणि समाधान देणारा क्षण सोमवारी अनुभवास आला.
सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी पेंढाखळे येथे आयोजित सद्गुरु अनिरुद्ध बापू यांच्या वैद्यकीय व आरोग्य शिबिरासाठी कोतोली ते पेंढाखळे दरम्यान सुरू करण्यात आलेल्या मोफत प्रवास सेवेचे उद्घाटन सागर वर्पे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याने परिसरात भक्तीभाव, सेवेचा संकल्प आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमाची सुरुवात कोतोली जिल्हा परिषद जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. संगीता शंकर पाटील व कोतोली पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार श्री. सुनील महीपती चौगुले (भाऊ) यांच्या पुढाकारातून करण्यात आली असून, ही सेवा सकाळी ८.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी प्रशांत पाटील, शंकर पाटील, गणेश पाटील, राम सावंत, सुनील चौगुले, दत्तात्रय पाटील, रघुनाथ रेडेकर, संभाजी सुतार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व गुरुभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीने हा उपक्रम केवळ राजकीय नव्हे, तर गुरुसेवा व लोकसेवेचा पवित्र संगम असल्याचे प्रकर्षाने जाणवले.
याचवेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते श्री. शंकर किसन पाटील (तात्या) यांनी अत्यंत भावनिक शब्दांत जाहीर केलेला पवित्र संकल्प उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.
“ही मोफत प्रवास सेवा केवळ आजच्या शिबिरापुरती मर्यादित न ठेवता, यापुढील काळातही सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या सर्व गुरुभक्तांसाठी कायमस्वरूपी व अखंडपणे सुरू ठेवली जाईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ही सेवा म्हणजे फक्त वाहनांची व्यवस्था नसून, गुरुभक्तीची वाट, माणुसकीचा हात आणि सेवाभावाची ओळख असल्याची भावना अनेक भक्तांनी व्यक्त केली. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी “गुरुसेवा हीच खरी लोकसेवा” या भावनेतून हा उपक्रम यशस्वी केला.
या पवित्र व अभूतपूर्व उपक्रमाचा लाभ सर्व गुरुभक्तांनी घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here