
प्रतिनिधी : जानवी घोगळे
उंड्री:लक्ष्य स्पोर्ट्स उंड्रीच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेत नांदगाव स्पोर्ट्स संघाने प्रथम क्रमांक पटकावला.संघाला १५ हजार रोख व चषक प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.दुसरा क्रमांक नांदारी स्पोर्ट्स संघाने मिळवला.त्यांना १० हजार रोख व चषक देण्यात आला.सोनूर्ले स्पोर्ट्स,वाळोली व निवडे स्पोर्ट्सला उत्तेजनार्थ प्रत्येकी ५ हजार रोख व चषक देण्यात आले.मँन आँफ दि सेरीजचा किताब सुरज गुरव यांना मिळाला.उत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान भिकाजी विचारे याला तर उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार सोनूर्ले संघाने पटकावला.लक्ष्य स्पोर्ट्स उंड्रीच्या वतीने नांदगाव येथील छ.शिवाजी महाराज स्टेडियम येथे स्पर्धा पार पडल्या.स्पर्धेचे नियोजन विजय मोरे,राहुल जोंधळे, महेश मोरे व अमोल लाड यांनी केले होते.


