उद्योजक राहुल डवरी यांच्या आत्या, प्रेमळ व साध्या स्वभावाच्या श्रीमती कमल बबन जगताप यांचे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अकस्मात निधन..

0
66

प्रतिनिधी : जानवी घोगळे

वारणा कोडोली / सातवे प्रतिनिधी: उद्योजक राहुल डवरी यांच्या आत्या, प्रेमळ व साध्या स्वभावाच्या श्रीमती कमल बबन जगताप यांचे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अकस्मात निधन झाले. त्यांच्या जाण्याने जगताप व डवरी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.श्रीमती कमल जगताप यांनी आयुष्यभर कुटुंबप्रेम, आपुलकी आणि माणुसकीची जपणूक केली. त्यांच्या शांत, संयमी आणि मदतीस तत्पर स्वभावामुळे त्या सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून होत्या. नातेसंबंध जपणे, कुटुंब एकत्र ठेवणे आणि प्रत्येकाला आपलेपणाने सामावून घेणे ही त्यांची खासियत होती. त्यांच्या स्मितहास्याने घरातील वातावरण नेहमीच प्रसन्न राहायचे.त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आठवणी सर्वांच्या मनात कायम जिवंत राहतील.त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता, मुक्काम *सातवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येत आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here