एस.पी. नाईन न्यूजचा जनहितासाठी आवाज — उत्तरे पुलावरील धोकादायक रस्त्यावर अखेर काम सुरू!

0
30

कोतोली प्रतिनिधी

कोतोली फाटा ते नांदारी दरम्यानच्या महत्त्वाच्या रस्त्यावर उत्तरे गावाजवळील पुलावर रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहनधारक व प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला होता. विशेषतः एसटी बस व अवजड वाहने या ठिकाणी आदळत असल्याने अपघातांची भीती दिवसेंदिवस वाढत होती. प्रवास म्हणजे अक्षरशः जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ नागरिकांवर आली होती.या गंभीर आणि धोकादायक परिस्थितीची एस.पी. नाईन न्यूज ने छायाचित्रांसह सडेतोड बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले. सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी उचललेला हा आवाज अखेर परिणामकारक ठरला.


बातमीची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाने उत्तरे येथील पुलावर रस्त्याचे दुरुस्ती काम सुरू केले आहे.
या कामामुळे वाहनधारकांना होणारा त्रास कमी होणार असून, प्रवाशांचा जीवित धोका टळणार आहे. अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आता समाधान आणि दिलासा दिसून येत आहे.


एसटी प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी एकमुखाने एस.पी. नाईन न्यूजचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
“आमचा प्रश्न कोणी तरी ऐकला, आमच्या सुरक्षेसाठी कोणी तरी आवाज उठवला,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
एस.पी. नाईन न्यूज — जनतेचा आवाज, जनतेसाठीच!लोकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर कृती घडवून आणणारे एस.पी. नाईन न्यूज पुन्हा एकदा जनहितासाठी धावून आले आहे.सत्य, निर्भीड आणि लोकहिताची पत्रकारिता म्हणजे एस.पी. नाईन न्यूज!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here