
पन्हाळा प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे
वाघवे गुडेग्रुप ग्रामपंचायतीकडून थकीत घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी इशारा
कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा: ग्रामस्थांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून घरफाळा व पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. थकीत रकमेची वसुली न झाल्यास दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील यांनी दिला आहे.
ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी घरफाळा व पाणीपट्टी वेळेत भरणे आवश्यक आहे. अन्यथा कोणताही शासकीय दाखला देण्यात येणार आहे.
त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी तातडीने थकीत रक्कम भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, फेब्रुवारी २०२६ मध्ये सध्याच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मुदत संपणार असल्याने त्यापूर्वी सर्व थकबाकी वसूल करण्यावर प्रशासनाचा भर आहे. अन्यथा संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

