नाईट कट्टा आळवे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त “होम मिनिस्टर

0
57

प्रतिनिधी : जानवी घोगळे

चला खेळूया खेळ पैठणीचा” कार्यक्रम 19 फेब्रुवारी रोजी पन्हाळा तालुक्यातील आळवे गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा 2026 निमित्त एक अनोखा आणि उत्साहवर्धक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नाईट कट्टा आळवे यांच्या वतीने “होम मिनिस्टर – चला खेळूया खेळ पैठणीचा” हा विशेष महिलांसाठीचा कार्यक्रम दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता ग्रामपंचायत पटांगण, आळवे येथे संपन्न होणार आहे.महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. आळवे गावातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नाईट कट्टा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमात विविध गटांनुसार आकर्षक बक्षिसांची रेलचेल असणार आहे.युवती गटासाठी स्मार्ट वॉच देण्यात येणार असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षिसे दिली जाणार आहेत.वयोवृद्ध आजी गटासाठी नऊवारी साडी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी देण्यात येणार आहे.महिला गटासाठी आकर्षक पैठणी साडी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी प्रदान केली जाणार आहे.याशिवाय कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध महाराष्ट्र फेम उत्कृष्ट निवेदक राहुल कदम हे करणार असून त्यांच्या ओघवत्या शैलीत कार्यक्रम अधिक रंगतदार होणार आहे.या उपक्रमाचे नियोजन नाईट कट्टा मंडळाचे अध्यक्ष साहिल लाड, उपाध्यक्ष मंदार खाडे, खजिनदार सत्यजित विकास पाटील, सचिन बंगे व इतर पदाधिकारी करत आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे आळवे गावात जयंतीनिमित्त सांस्कृतिक उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत आणि त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देत “होम मिनिस्टर – चला खेळूया खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम नक्कीच आळवे गावासाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा ठरणार आहे.नाईट कट्टा मंडळाच्या वतीने आळवे गावातील सर्व महिलांना उपस्थित राहण्याचे व सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here