विकास वाडी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असे नाव देण्यात यावे.

0
25

प्रतिनिधी : जानवी घोगळे


कोल्हापूर:– जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रयत्नातून व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या क्रीडा नगरीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम होण्यासाठी झालेला शासनाचा निर्णय. हा खूप गौरवशाली आणि ऐतिहासिक निर्णय आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील व कोल्हापूर शहरातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेळाडू क्रिकेट सारख्या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेतील आणि भविष्यात एक दिवस भारताचे प्रतिनिधित्व करतील. या निर्णयामुळे ही सुवर्णसंधी क्रिकेट खेळाडूंना मिळणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थान काळापासून सर्व खेळांना राजाश्रय देऊन सर्व खेळांसाठी खूप चांगल्या चांगल्या योजना करून कोल्हापूरच्या क्रीडा नगरीचे नाव आंतरराष्ट्रीय दर्जावर कोरले आहे. म्हणूनच विकास वाडी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असे नामकरण व्हावे. अशी शाहूरायांच्या क्रीडा नगरीतील सर्व क्रीडा प्रेमींची लोक भावना निर्माण झाली आहे. म्हणून शासनाने या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी” लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असे नामकरण करावे. असे या निवेदनातून आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्रा .डॉ. महेश अभिमन्यू कदम. यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
माननीय,
संपादक सो, दैनिक——-
वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात/न्यूज चॅनेल वरून प्रसिद्ध करून क्रीडा उपकृत सहकार्य करावे ही नम्र विनंती.
आपला
प्रा. डॉ.महेश कदम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here