प्रतिनिधी : स्नेहल घरपणकर
कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) कॉलेजला नॅकचे ए प्लस मानांकन मिळाले आहे. दरम्यान या मानांकनामुळे पुन्हा एकदा कॉलेजच्या दर्जात्मक परंपरेवर शिक्कामोर्तब झाले आहे. सर्व प्राध्यापक विद्यार्थी वर्ग कर्मचारी यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून हे मानांकन आपल्याला मिळत असल्याचे महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन डॉ.अक्षय थोरवत यांनी सांगितले.रजिस्ट्रार डॉ.एम.एम.मुजुमदार यांनी कमिटीने अधोरेखित केलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती यावेळी सर्व उपस्थितांना करून दिली.महाविद्यालयाचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी येत्या काळात आपण आपली स्वायत्तता अधिकाधिक चांगल्या प्रकारे सशक्त करून आपल्या प्राध्यापकांचा ,विद्यार्थ्याचा शैक्षणिक दर्जा अजून वाढवून हे मानांकन अजून चांगल्या पदाला जाईल यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त केली व सर्वांना या कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या.राष्ट्रीय स्तरावरील नॅक कमिटीने २४ व २५ ऑगस्ट २०२३ रोजी कॉलेजला भेट दिली होती. कमिटीचे अध्यक्ष प्रा.कुना रामजी, सचिव अजयकुमार बन्सल, सदस्य प्रा.राठीनावेलू अरुमुगम यांचा कमिटीत सहभाग होता. या कमिटीने महाविद्यालयातील सर्व सोयी सुविधा, व्यवस्था, रचना, रिझल्ट, अभ्यासक्रम,कॅम्पस प्लेसमेंट, प्राध्यापकांची संख्या, दर्जा या व इतर सगळ्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून आपला अहवाल दिला होता.आजच सायंकाळी त्यांच्याकडून आलेल्या पत्रानुसार केआयटी महाविद्यालयास नॅक ए प्लस मानांकन मिळाले असल्याचे त्यांनी घोषित केले.संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली ,सचिव श्री. दीपक चौगुले अन्य विश्वस्त कार्यकारी संचालक, संचालक, रजिस्टर, सर्व डीन, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान व सहभाग या नॅक साठी मिळाल्याबद्दल नॅक समन्वयक डॉ.ग्रंतेज ओतारी यांनी सर्वांचे आभार मानले.